शुक्रवार, 5 जून 2009

मुलाचा निबंध

....आवडता पक्षी--बदक !!....

बदक मला आवडते!!..बदक पाण्यात असते !!..मी पण पाणी पितो!!आमच्या बाजूचे बबन काका दारू पितात!!..दारू वाईट असते असे गांधीजी सांगत!!..गांधीजी मोट्ठे नेते होते!!..पण त्यांच्या हातात काठी पण असते!!..काठी पाण्यावर तरंगते..व बदक सुद्धा तरंगते!!..बदक जास्त उड़त नाही..पण पोहते..मी पण swimming ला जाणार आहे!!.बदक वाकड्या पायाने चालते..आमच्या building मधल्या सुलेखाला आम्ही बदक म्हणतो! (सुलेखाताइने मला काठीने मारले!!)..बदक काठीने मारत नाही!!..गांधीजी काठी वापरत;म्हणुन आपला देश लवकर स्वतंत्र झाला...आमच्या घरी कपडे वाळत घालायला काठी वापरतात!!..(आमची आज्जी कुत्र्यांना घबरवायला काठी वापरते!!)..आमच्या घरात चिमण्या व कबुतरे येतात...खिडकीपाशी कावले पण येतात..!!पण बदक येत नाही!!..कारण ते उंच उडू शकत नाही!!..(आम्ही १ st floor ला राहतो)...पण बदक पाण्यात रोज आंघोळ करते!! ..मी पण आंघोळ करतो..कारण आई ओरडत असते!!..पण मी पाच मिनीटात आंघोळ करतो!!बदक रोज आंघोळ करते म्हणुन ते गोरे असते ...(पण काले बदक सुद्धा असते ...ते बहुतेक आंघोळ करत नाही!!)...मला बदक खुप आवडते

मंगलवार, 12 मई 2009

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.



मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

घन्टा व्हायची वाट का असेना
मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,
घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्र बसाय 



 




बुधवार, 22 अप्रैल 2009

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

चैताचा महिना आला...
मराठीच्या वर्षाचा आरंभ झाला...
दिवस तो शुभमुहुर्ताचा,
गुडी उभारुन मान उंचवण्याचा...

आता सारी मंडळी...
धुलवडीच्या नशेतून बाहेर आली...
नववर्षाची कशी
जय्यत तयारी सुरु झाली...

सजायला लागली मंदीरे
सजायला लागली घरे...
भिंतीवरी घराच्या चढवु लागली...
रंगरंगोटीची नव नवीन थरे...

साडेतीन मुहुर्ताचा दिस म्हणून
खरेदीचा बेत आखू लागले...
फुलांच्या माळानी दाराची तोरणे सजवू लागले...

आता सुरू झाली गुढीची तयारी
तीला नेसवली साडी नवारी...
नटली गुढी मराठमोळ्या परंपरेची...
मान उंचावुन सांगते ती गाथा शुरविरांची...

चला गुळ खोबरं वाटूया...
गुढीसमोर पुरणपोळीचा नैवद्य ठेवूया...
ह्या भरकटलेल्या समाजाला गुढीचं पावित्र्य सांगून
सहकुटुंब दोन्ही हाताने वंदन करूया...

मित्र मैत्रिणिनो गुढीपाडवा म्हणजे
चैत्र शुध्द्प्रतिपदा ...
तुम्हाला या मराठी वर्षाची...
जाण राहुदे सदासर्वदा...

आता उभारा गुढी समजूतीची
उभारा ग़ुढी माणुसकीची...
पेटवा मशाल तारूण्याची...
मग चला तर ग़ुढीपाडवा साजरा करू...
अन शान वाढवूया या विजयी महाराष्ट्राची..

सोमवार, 3 नवंबर 2008

विलास देशमुखांना खुले पत्र.

बहुतेक वेळा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना "माननीय" असे संबोधण्याची प्रथा आहे. पण आपणाबाबत आता असे म्हणावेसे वाटेनासे झाले आहे. गेल्या काही वर्षात आपण व आपल्या पक्षाने महाराष्ट्राचे नक्की काय भले केले काही कल्पना नाही. मुंबईत बड्या बिल्डरांचे मॉल्स आलेत, गिरणगावातून मराठी हद्दपार होतेच आहे, शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे, विजेचा प्रश्न तसाच, टाटांची नॅनो महाराष्ट्राला हुलकावणी देऊन गुजराथाला निघून गेली. गेली काही वर्ष आपण मुंबईला शांघाय करण्याच्या वावड्या उठविल्या होत्या. ते कधी आणि कसे होणार त्याचा काहीच पत्ता नाही, (मुबईत जागांचे भाव मात्र शांघाय सारखेच !). परंतु, आपण आता मुंबईचे उत्तरप्रदेश अथवा बिहार नक्कीच कराल ह्याबद्दल अजिबातच शंका नाही.

नुकत्याच झालेल्या राज ठाकरेंच्या अटकेनंतर आपण नक्की कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहात असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ऐन दिवाळी व छठ पूजेच्या निमित्ताने आपण उत्तरप्रदेश आणि बिहारच्या लोकांना दिलेली हि भेटच! राज ठाकरेंच्या हक्क मागण्याच्या पद्धतीबद्दल आक्षेप असणे स्वाभाविक आहे, परंतु त्यांचे मुद्देही तितकेच योग्य आहेत. आपण त्यांच्या कृतीबद्दल त्यांना तुरुंगात डांबले आणी ज्या मुद्द्यासाठी मनसेने आंदोलन केले त्या मुद्द्याला मात्र जाणीवपूर्वक बगल दिलीत. लालू यादव ह्यांनी मात्र आपल्या लोकांची पुरेपूर काळजी घेतली. त्यांच्या लोकांच्या रेल्वे भरतीच्या आड येणाऱ्या रा़ज ठाकरेंना तुमच्यातर्फे अटक करविली. आपल्या लोकांसाठी रेल्वेची परीक्षा पुन्हा घेण्याची घोषणा केली व मुंबईत छठपुजेचीही ( मराठी माणसाच्या नाकावर टिच्चून ) पुरेपूर सोय करून घेतली.

आपल्याच बरोबरीने, शिवराज पाटीलही राजवर तितक्याच जोमाने लोकसभेत कडाडले ( हाच कणखरपणा त्यांना अतिरेक्यांच्या बाबतीत मात्र दाखवता आला नाही. ). राज ठाकरेचे विचार मराठी माणसाला मान्य नाहीत अश्या आशयाचे (हास्यास्पद)विधानाही त्यांनी केले. आपल्या काँग्रेसचे महाराष्ट्रातले इतर खासदारही रेल्वे नोकर भरती संबंधी काहीही आवा़ज उठविताना दिसले नाहीत. पाटलांच्या वक्तव्यावरून त्यांची आणि काँग्रेसची, मराठी माणसांशी नाळ किती जुळतेय ते लक्ष्यात आले. आपणही, राज ठाकरेंच्या नावाने मराठी माणसांच्या भावनांना मिळणारी वाट, त्यांना अटक करून बंद केलीत. राज ठाकरेंच्या अटकेनंतर आपण रेल्वेभरतीबद्दलही तितकेच आग्रही आणि मराठी हितसंरक्षणासाठी काही घोषणा केली असती, तर आम्हाला तुम्ही आमचे आणि ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वाटला असता. परंतु महाराष्ट्राच्या मागण्यांसाठी आमचे दिल्लीतील प्रतिनिधी काहीही करत नाहीत हे राजचे म्हणणे आपण आणि आपल्या पक्षाच्या खासदारांनी सत्य करून दाखविले.

पटण्यामध्ये आज राजच्या अटकेच्या बातमीने फटाके फुटत होते. वर त्यांना परीक्षा पुन्हा देण्यासंबंधी घोषणाही झाली होती. माघारी परतल्यावर त्यांनी तिथे केलेली स्टेशनची नासधूस ही काही "मिडिआवाल्यांसाठी" बातमी नव्हतीच. इथे, मात्र राजही अटकेत, रेल्वेभरतीबद्दल मराठी माणसांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल आपणाकडून एक शब्दही नाही! आपण व आपल्या पक्षाने, राष्ट्रवादी ( महाराष्ट्रवादी नाही ) काँग्रेसबरोबर मिळून आपल्याच मराठी माणसाला दिलेली ही दिवाळी भेट अवघा महाराष्ट्र नेहमीचं लक्षात ठेवेल ह्यात अजिबात शंका नाही. ह्यापुढे मात्र आपणास निवडणूक लढवायची असल्यास आबांबरोबर आपण ती उत्तरप्रदेश किंवा बिहारमधूनच लढवावी कारण आपला खरा चाहता वर्ग आता तिथेच असणार आहे, महाराष्ट्रात नाही.

इथे दहिसरला लिंकरोडवर अलीकडेच ( दहिसर सध्यातरी आपल्याच राज्यात आहे ), अनधिकृतरीत्या खारफुटीवर भराव टाकून काही हजार झोपड्या ( अर्थातच भैय्यांच्या ) जन्माला आल्या आहेत. ज्याप्रकारे आपण कायद्यावर बोट ठेवून, मराठी हिताच्या विरोधात, राजवर कडक कारवाई केली, तशीच कारवाई ह्या "गरीब बिचाऱ्या भैय्यांच्या अनधिकृत" वस्तीवरही करणार का? की येत्या निवडणुकांसाठीचा आपला हाच मतदार संघ असेल? की लालूंनी मागणी करताच आपण ह्या झोपड्याही अधिकृत करून त्यांना मोफत घरे देणार? कारण आपण तिथे जाऊन निवडणुका लढविण्यापेक्षा त्यांनाच इथे वसविणे हा उत्तम पर्याय आपणासाठी खुला आहेच. मग मराठीची कितीही गळचेपी का होऊ नये आपणास चिंतेचे कारण नाही. मीडिआ, राष्ट्रवादी, भैय्ये आणि पक्षश्रेष्ठी खूश म्हणजे अवघा महाराष्ट्र खूश नाही का? असो ह्यापुढे आपणास, आपल्या पक्षास आणि आपल्या "सहकारी" पक्षास माझे तरी मत नाही. तुम्ही जर महाराष्ट्रात मराठी माणसाचे राजकारण करणार नसाल, मुंबईतून मराठी हद्दपार करणार असाल, रेल्वेत फक्त लालूंचे भैय्येच भरणार असाल, तर महाराष्ट्राही तुम्हाला येत्या निवडणुकीत कायम लक्षात राहील असा धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही.

गुरुवार, 4 अक्तूबर 2007

कधीतरी असेही जगून बघा .....

कधीतरी असेही जगून बघा .....

माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा !
"किती जगलो " याऐवजी " कसे जगलो"?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा !
कधी असेही जगून बघा .....

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा !
तर कधी कोणाच्या हास्यासाठी , समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा !
कधी असेही जगून बघा .....

संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा !
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा !
कधी असेही जगून बघा .....

वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा !
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले ?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा !
कधी असेही जगून बघा .....

प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी ?
एखाद्यावर जिवापाड , निर्मळ, एकतर्फी प्रेम करुन तर बघा !
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते
त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा !
कधी असेही जगून बघा .....

अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले ?
कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा !
चिमणी सारखा जन्म मिळाला असला तर काय झाले ?
आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुन तर बघा !
कधी असेही जगून बघा .....

आयुष्य रोजच वेगवेगळे रंग उधळते
त्या रंगांमधे आनंदाने रंगून तर बघा !
तसे जगायला काय ? कुत्रे- मांजरीही जगतात हो
कधीतरी माणूस म्हणुन स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधून तर बघा !
कधी असेही जगून बघा .....

बुधवार, 30 मई 2007

शनिवार, 26 मई 2007

आई...